Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखभंडाराविदर्भसाहित्यगंध

मोकळी

कु. संगिता रामटेके/भोवते ता.साकोली,जि.भंडारा.

0 4 8 2 9 7

मोकळी

श्वास कुठेतरी कोंडला
हृदय जखडले दोरखंडाने
शोधले वाऱ्यावर, नदी तटी
रानीवनी पांगले शब्द
गवसेचना
खूप यातना जीव गुदमरला
अजुनही शब्द नाही गवसला
प्रसवूनी त्यास व्हावे मोकळी
वेदनेने जीव आला घायकुतीला

हलकीशी झुळूक यावी आणि शब्दांची मोहोर उमलून जावी, वाटे शिंपडावा सडा शब्दांचा आणि सबबीच्या तडाख्यात तो विरूनी जावा. असंच काहीसं होतं माझ्यासोबत. मला मोकळं व्हायचंय. होताच येत नाही. शब्दांच्या श्रावणसरी माझ्याच घराला सोडून बरसतात.. का बरं? मी पण तहानलेलीच आहे. विचारांनी आच्छादलेले मन रिते करायचे मला, पण जमतंच नाही. तरी मी आळवलं पावसाला, काळोखी नभाला, तुझ्या सरींतून कोसळणारे शब्द दे ना मला… ‘अच्छा नाही तर नकोस देवू मग’, ती नभात थयथयाट करणारी शलाका मला हिणवते, चिडवते मजला. तिचे नर्तन उतरू दे जरा माझ्या शब्दांत. चित्तारू दे तिचे अफाट, विराट रूप माझ्या शब्दांत. तिची ती भयगर्जना माझ्याही मनात नकळत पेरून जाते एक अस्वस्थता. तू अशीच आहे कमजोर शक्तिहीन आणि अबोल. तुला तर बोलताच येत नाही. शब्द हवेत ना. मग विहरू दे मनाला मेघमालेत. मग देईल गर्जना मन मेघमालेत विहरतांना.

कधी इवलेसे, तर कधी ओंजळीएवढे, कधी सुपाएवढे तर कधी त्याहुनही मोठे, पण हसतात बघ कसे झाडांच्या कडेवर बसून. खूप आनंदी जणू हजार हात टाळ्या वाजवत आहेत असा त्यांचा पर्णनाद. जरा मलाही भरू दे त्यांच्यासवे हुंकार. हुंकारासाठी हवेत का शब्द? हां.. हवेत ना… तेव्हाच तर माझा हुंकार भरेल गर्जना..! वाऱ्याच्या कणाकणांतून …दाही दिशांतून वाहतांना..!! मग शब्दही लक्ष लक्ष सुमनांचा गंध श्वासात भरून येतील माझ्याकडे, मला मोकळी करायला. मी मग प्रसवेल शब्दांना, माझ्या मनाप्रमाणे होईल मोकळी एकदाची.

कु. संगिता रामटेके/भोवते
ता.साकोली,जि.भंडारा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे