0
4
8
2
9
3
ऋणानुबंध जुळले
ऋणानुबंध जुळले अवचित
झाला अनपेक्षित मिलाप
प्रेमगीतास या सुर गवसले
लाभला सुरेख आलाप
प्रथम भेट ही आपली
झाली नदीच्या किनारी
भेदून गेली नयनबाण
आपल्या काळजाची तुतारी
भेटलो आपण एकदाच
झालो अखंड जीवनसाथी
संचित होते चितारलेले
आपल्याच सौभाग्याच्या माथी
एकमेकांसाठीच आपण होतो
विधात्याच्या लेखणीच्या पानात
घडून आले अकल्पित सारे
जे पाहिलेही नव्हते स्वप्नात
जीवनभर सोबतीच आपण
जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी
सुखावले आयुष्य सारे आता
प्रेमाला प्रेमाने घातली मगरमिठी
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
3



