प्राचार्य अनिल दारकुंडे ‘कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित’
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
प्राचार्य अनिल दारकुंडे ‘कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित’
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे दारकुंडे मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून सेवारत
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि ५ डिसे) : अनिल दारकुंडे सर आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये गेली २६ वर्षे ज्ञानदानाचे कार्य प्रभावीपणे करीत आहेत. सहाय्यक शिक्षक, पर्यवेक्षक तसेच दि.१ फेब्रुवारी २०२४ पासून ते मुख्याध्यापक / प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आवास केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून १० वर्षे त्यांनी उत्कृष्ट कामकाज केले आहे. अलिबाग तालुका शिक्षण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून ते प्रभावी पणे काम करीत आहेत. शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी आद्य शिक्षिका, कवियत्री सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट – रायगड, भाई जगताप मित्र मंडळ – रायगड आणि अॕड. उमेश ठाकूर मित्र मंडळ – रायगड, यांच्या संयुक्त विद्यमाने सातिर्जे, अलिबाग-रायगड येथे त्यांना आमदार भाई जगताप, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार रविंद्र धनगेकर, सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी [ दादूस ], रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य रविंद्र ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुनिल थळे, काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष अॕड. उमेश ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार – २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल त्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व आजी माजी विद्यार्थी यांनी आभिनंदन केले. तसेच त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.