Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 8 5

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*

*☄विषय : झाकणझुल्या☄*
*🍂शनिवार : ०६/ ०९/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झाकणझुल्या*

अरे झाकणझुल्याची,गावोगावी वस्ती झाली।
मग म्हणे माणसाची ,कुत्र्यापरी गती झाली।

भाकर तुकडे खाई, पाय चाटती प्रेमाने।
अमिषाने रक्तामंधी ,निष्ठा पाळतो नेमाने।।

जातीपाती धर्म पक्ष,स्वार्थाने टिकून आहे।
टीचभर पोटासाठी, माणसे विकून आहे।।

सार्थक या जीवनाचे,कळत नाही कुणाला।
हेवेदावे कपटाने,ग्रस्त केले समाजाला।।

अच्छेदिन आले कुठे, जीएसटीने लुटले।
अखंडित देश कसा, जिथे कुटुंब फुटले।

व्रुतपत्रे मिडीयाही, सत्याला सांगत नाही।
दुधाचे दुध पाण्याचे पाणीच मांडत नाही।।

समाज सेवक नेते , खुपच पुढारी झाले।
गोडगोड बोलतात,देशाचे लुटारी झाले।

देवही ऐकून घेतो, या लबाडांचे गार्हाणे।
साखर चारतो त्याला,मग पावतो लाडाणे।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकण झुल्या*

विकून आपली माणुसकी
पत्करतो समाजाची लाचारी
जिवन जातो झाकण झुल्यात
त्यांच्या आयुष्याची काय खरी

कुणाच्या दबावाखाली राहून
कूकरच्या झाकणं परि असतो दबून
झाकण त्याचा होतो ढीला
सू सू चा होतो किलबिला

नाही आपल्या मनाचा कारभार
त्याच्यावर असतो कर्तृत्वाचा भार
जेव्हा त्याच्या येतो नाकी नव
मग दुसऱ्याकडे व्यक्त करतो मनातील विचार

ह्या झाकण झाल्याचा नावच मोठा
सर्वांनाच होत असतो खोटा
खरच असतो दबाव तंत्राखाली
एकंदरीत बनत जातो मवाली

यात असतो त्याचा स्वस्वार्थ
नाही त्याच्या जीवनाला अर्थ
संसार त्याचा असतो वाऱ्यावर
तो तसाच जगत असतो जीवनभर

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*

असतात असे काही,
ठोस निर्णय घेत नाहीत.
झाकणझुल्या म्हणतात,
किंमत कवडीची नाहीत.

जसे झाकण डब्याचे,
हलणारे कधी कधी,
उघडझाप करताना
विसरते कधी कधी.

विचारत नाही कुणी
झाकणझुल्या माणसाला,
यश नसते पदरात,
नेहमीच असतो हरलेला.

जन्माला आला आहेस,
जगावे कसे ठरव आता.
बनायचे झाकणझुल्या की
निष्ठावान व्यक्ती जाता?

कर्तव्य कर प्रामाणिक,
झाकणझुल्या नको बनू.
आठवणीत राहशील सदा,
निष्ठावान आम्ही म्हणू.

*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*

आजकाल रोजच भेटतो
कुठे ना कुठे झाकणझुल्या
करतो हसुन साखर पेरणी
साऱ्यांसाठी गोडबोल्या

मी किती साधा सरळ
नाकापुढे चालणारा
गोष्टी गोष्टींत दुसऱ्याची
जाणून वाट चुकवणारा

नित निष्पाप चेहरा ठेवणं
कसं काय जमतं रे तुला
चेहऱ्यामागील विकृत मन
दिसले कसे नाही कुणाला

मी कसा भणंग भिकारी
निघेना फुटकी कवडी खिशातून
दररोज खायला आवडतं ना
तुला याच्या त्याच्या कडून

खूपते पुढे जाणं डोळी
पाय खेचुन का जातो वर
नुसती स्वप्ने कार्य शुन्य
भ्रष्ट्राचाराने भरतोस घर

तुच दिलेला आजार
त्यावर उपचारही तुझे
आत्म प्रौढी संपेना कधी
पाऊल तुझ्या वळणावर माझे

मी ओळखेन कधी पुर्ण
झाकणझुल्या तुजला
तालावर नाचतो तुझ्या
कळेल कधी मजला

*कु. संगिता रामटेके/ भोवते*
*साकोली, भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झाकणझुल्या*

झाकणझुल्या रे झाकणझुल्या
किती रे तू करशील तोरा?
याची टोपी त्याला,त्याची याला
तुझे कारनामे कळतात चोरा

स्वार्थसाधू तू लबाड पुरता
सत्तेला हपापलेला नेता
आपली तुंबडी भरशी सदा
भ्रष्ट असा तू कसला नेता?

लंबी चवडी भाषणे ठोकशी
बोलाची कढी भात बोलाचा
जनतेने अरे जाणलाच पुरा
चेहरा खरा मुखवट्या आडचा

जिथे फायदा तिथे जातो
पैशापासरी विकला जातो
पक्षबदलू हा तर पुरता
देशभक्त का याला म्हणता?

आश्वासनांचे ताशे वाजवी
स्वार्थ साधता तोंडा पाने पुसतो
झाकणझुल्या सोड सिंहासन
जनतेचा एकच नारा घुमतो

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*

झाकणझुल्या वृत्तीचा, काय वर्णावा थाटमाट
एक ना धड भाराभर चिंध्या, फुशारकीचा घाट..

याच्या जिभेला नसे हाड, ऐकणारा हवा ताठ
ना शेंडा ना बुडका, म्हणे मला इतिहास पाठ..

असून घोटाळा नसून खोळंबा, जेथे तेथे वांदा
ना जाणो कुठे गहाण पडला, अकलेचा कांदा..

धरला तर चावतोय अन्, सोडला तर पळतोय
ग्रहण लागल्यासारखा, वाट्टेल त्याला छळतोय..

निरूपयोगी सल्ला यांचा, कामाचा ना धामाचा
असे निव्वळ वाचाळवीर, तोलाचा ना मोलाचा..

खिशात नसते दमडी, लाखोंच्या पोकळ बाता
किंमत नसे कवडीची, म्हणे मीच गावचा नेता..

व्यर्थ जिव्हा शिणवावी, अनर्थकारक वर्तणूक
फक्त विदूषकी चाळे, होई फुकटची करमणुक..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*

झाकणझुल्या बिनबुडाचे
आरोप करून
आपली करतो सुटका
कुणावर ठपका ठेवून ॥१॥

स्वत:च्या गुणदोषांचे
खापर फोडतो दुसऱ्यावर
तुझ्या हासऱ्या चेहऱ्याचे
गुपीत जाणती मान्यवर ॥२॥

झाकणझुल्या किती काळ
असे उपद्याप करशील
आत्मनिरीक्षण कर थोड्यावेळ
तरच कांही करू शकशील ॥३॥

झालेगेले विसरून जा
घे जरा मन:शांती
अन्यांना जगू देत जा
मिटेल तुझी भ्रांती ॥४॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे