
0
6
2
9
0
4
एक झोका (बालकाव्य)
शाळेत जाता-येता रस्त्याने
उंच वडाचे झाड दिसते मला
झाडाच्या पारंब्या म्हणतात की,
एक झोका हवाय का तुला..!
मी ही दप्तर बाजूला ठेऊन
पारंब्याना लगेच लटकून जाते,
मागे पुढे पाय टेकवून जोरात
एक एक झोका मलाच घेते…!
हळूहळू झोक्याचा,वेग वाढत जातो
मधेच स्वतःभोवतीही गिरकी घेतो
शाळेत जाणारा प्रत्येक जण मात्र
असा रोजच मला मग बघतो ..!
एक झोका घेण्याच्या नादात
शाळेची घंटा केव्हाच वाजली
आणि माझ्या झोक्याची बातमी
लगेच आजीच्या कानी लागली..!
वर्ग बुडवून झोके घेते म्हणून
पारंबीलाच आजीने माझे हात बांधले
एक झोका बालमनाचा घेण्यात मात्र
माझ्यावरच सर्वजण हसले चांगले ..!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
0
6
2
9
0
4



