स.भु. क्रीडा महोत्सवात बालानगर शाखेचे घवघवीत यश
पद्माकर वाघरूळकर ईश्वर कसबे
स.भु. क्रीडा महोत्सवात बालानगर शाखेचे घवघवीत यश
प्रतिनिधी पद्माकर वाघरूळकर
ईश्वर कसबे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
बालानगर दि. २० (प्रतिनिधी)- श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या आंतरशाखीय बाराव्या क्रीडा महोत्सवामध्ये श्री सरस्वती भुवन प्रशाला, बालानगर शाखेच्या चौदा वर्षीय गटामध्ये मुलीं अजिंक्य रहात प्रथम क्रमांक पटकावला व सतरा वर्षांखालील गटामध्ये मुली खोखो द्वितीय क्रमांक पटकावला.
* 400 मीटर धावणे दिव्या कदे तृतीय 14 वर्षे वयोगट
* 800 मीटर धावणे साध्वी काळे प्रथम क्रमांक 14 वर्षे गट
* 800 मीटर धावणे विद्या गोर्डे द्वितीय 17 वर्षे वयोगट
* गोळा फेक 8.53 मीटर तेजस गोर्डे द्वितीय क्रमांक
* सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, शालेय समितीच्या अध्यक्षांसह सर्व सदस्य तसेच शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले.



