0
4
8
2
9
3
विरह
जळते सखी मन माझे
येई आठवण तुझी मनी
पुरे झाला विरह आता
विझू दे मनातील अग्नी
सोड लाडीकपणा तुझा
फुलून जाऊदे प्रेमांकुर
घाल पाणी पिऊ दे वारा
झाले पिण्या डोळे आतुर
सोसवेना भारही फुलांचा
कसा घालू त्याला आवर
टाक सडा त्याच फुलांचा
अंगणी पडेल पाणी सावर
नको करू हेटाळणी माझी
सांग कुठे काय माझे चुकले
केली कदर ती राखला मान
पाहून तुजला डोळेही झुकले
विसर राग तू ये गं *लव्ह* कर
आव नको आणू वेडेपणाचा
होईल हलके वेडे मन माझे
संपव तूच या *विरह* मनाचा
श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव
नांदेड
0
4
8
2
9
3



