Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरराजकियविदर्भ

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देशक गिरीशबाबू खोबरागडे यांची निवड

सविता धमगाये, प्रतिनिधी, नागपूर

0 4 8 2 8 6

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देशक गिरीशबाबू खोबरागडे यांची निवड

सविता धमगाये, प्रतिनिधी, नागपूर

नागपूर: रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार उपेंद्रजी शेंडे साहेब यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदी मा. देशक गिरीशबाबू खोबरागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दि. ०५.०१.२०२५ रोजी नागपूर येथे आमदार निवासातील सभागृहात रिपब्लिकन पक्षाची (खोरिपा) केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. ह्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.

ह्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष नामांतरवीर स्मृतिशेष रिपब्लिकन नेते, माजी आमदार उपेंद्रजी शेंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. ह्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. निस्वार्थी, प्रामाणिक, त्यागी, निष्ठावान नेता गमावल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर रितसर मा आ उपेंद्रजी शेंडे साहेब यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदी मा. देशक गिरीशबाबू खोबरागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नागपूर प्रदेशच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष मा. देशक गिरीशबाबू खोबरागडे यांच्यासह सरचिटणीस मा. उत्तमराव गवई व कोषाध्यक्ष मा. जीवन बागडे यांचाही पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे