पीएमश्री न.प.शाळेत महामानवाला अभिवादन
नागपूर: तालुका प्रतिनिधी
कळमेश्वर : पीएमश्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोहपा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्कृती लाड,तर रूचिका राऊळकर,निलेश तांबे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप विघ्ने,ज्येष्ठ शिक्षक अशोक लोणकर,रत्नमाला मांडवकर,चंद्रकांत गहूकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रदीप विघ्ने, अशोक लोणकर,रत्नमाला मांडवकर, चंद्रकांत गहूकर यांनी महामानवाचे जीवनचरित्र व कार्यावर प्रकाश टाकला.
संस्कृती लाड,रूचिका राऊळकर,निलेश तांबे,हस्मिता देशभ्रतार,परी निवल,शुभ्रशी डोंगरे,अवनी सेवतकर,धनश्री चिमोटे, अनुष्का रेवस्कर,खुशी नेरकर,सिद्धी तभाने,सोनाक्ष श्रीखंडे,मैत्री गौरखेडे,आराध्या श्रीखंडे,दूर्वा हिरटकर,युक्ती बेलसरे,पूर्वी श्रीखंडे,क्रिश बोडखे,सौम्या गणोरकर आदींची भाषणे झाली.
इयत्ता आठवीतील विद्यार्थींनीनी महामानवाच्या जीवनावर गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पायल पटेल,तर आभार वैष्णवी काळे हिने मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश वानखेडे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.