0
4
8
2
9
7
ध्येयप्राप्ती
छातीला लावून माती
द्याव लागते झोकून
तमा न बाळगता कशाची
जाव लागत झिजून
कैक वेळा मनातील
ईच्छा आकांक्षाना
कराव लागत दफन
तरीही
सळसळतच ठेवायच रक्त
रणांगणात उतरतांना…..
पूर्णत्वास नेण्यास अपेक्षा
जीद्द चिकाटी मेहनतीच्या
अश्वावर व्हाव लागत आरूढ
टाच द्यायची अशी की
वायूवेगे दौडतच रहायच….
क्षितीज करायच पार
आणि झेप घ्यायची अशी की
आकाश येईल कवेत…
विजयाची पताका रोवायची
नभाच्या छाताडावर
आणि मग अनुभवायचा तो
विजयाचा उन्माद
अख्ख चराचर
तुलाच घालेल साद
निनादेल दाही दिशांतून
विजयश्रीचा गजर
ध्येयप्राप्ती नंतर…..
अरविंद उरकुडे,गडचिरोली
===========
0
4
8
2
9
7



