अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कराटे संघाला तृतीय स्थान
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सत्कार

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कराटे संघाला तृतीय स्थान
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सत्कार
स्पर्धा दिब्रूगढ आसाम येथे ६ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडली.
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि २२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कराटे संघाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणाऱ्या कराटे संघाचा माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६ रोजी सत्कार करण्यात आला.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभा कक्षात आयोजित कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. संभाजी भोसले, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अखिल आंतर-विद्यापीठ कराटे पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा दिब्रूगढ विद्यापीठ, दिब्रूगढ आसाम येथे ६ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठाच्या कराटे काता पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले.
यावेळी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते खेळाडू मानस राऊत, मनीष नार्वेकर, अक्षत धरमठोक आणि आयुष पाठराबे, वैयक्तिक कुमिते (–७५ किलो) गटात तिसरे स्थान प्राप्त करणारा हृतिक मुदलियार यांचा सत्कार करण्यात आला. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. झाकीर एस. खान, पुरुष संघाचे प्रशिक्षक श्री. जगदीश मंकार तर महिला संघाच्या प्रशिक्षिका वैदेही शेंडे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. संभाजी भोसले यांनी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्या वेळेत बचत तसेच शारीरिक बळकटी मिळाली, असे सांगितले. खेळाडूंना विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने कुलगुरू तसेच विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.



