0
4
8
2
9
0
रोजचेच…
आहेस तू आत्ममग्न
स्वतः च्या इच्छेवर चालणारा,
नाजूक कोमल माझ्या भावना
दूर्लक्ष करून कोलणारा…!!१!!
स्वतः साठी जगणारा तू
आत्मदृष्टीत गुरफटलेला,
तुझ्या सोबत भावनांचा
प्रत्येक क्षण फरपटलेला…!!२!!
वक्रदृष्टी तुझी तत्पर
यशाची अडसर निशाणी,
वळते पाऊल मागे मागे
भेगाळलेल्या ह्दयानी…!!३!!
आत्मविश्वास डळमळतो
उंच शिखरावर चढताना,
कैक जखमा देऊन जातो
पावलोपावली ठेचाळताना…!!४!!
रोजचेच झाले आता
पडणे रडणे ठेचाळणे,
पुन्हा उठून उभे राहत
नव्या उमेदीने जगणे…!!५!!
शर्मिला देशमुख -घुमरे
केज रोड, बीड
0
4
8
2
9
0



