ॲड.दत्ता पाटील लॅा कॉलेज “बेस्ट काउन्सिल फॅार प्रॅास्युकेशन ” पुरस्काराने सन्मानित
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ॲड.दत्ता पाटील लॅा कॉलेज “बेस्ट काउन्सिल फॅार प्रॅास्युकेशन ” पुरस्काराने सन्मानित
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: दिनांक ११जानेवारी २०२५, रोजी ॲग्नेल स्कूल ऑफ लॉ, वाशी, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये भारतातीलच नव्हे तर परदेशातील महाविद्यालयांनीही सहभाग घेतला होता.ॲड.दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या संघामध्ये कु.प्रियदर्शनी प्रभाकर पाटील (टी.वाय.एलएल.बी.), कु.आदित्य प्रदीप कांबळे (एफ.वाय.एल.एल.बी.), कु.कुश अनिल चोपडा (एस.वाय.बी.ए.एल.एल.बी), कु.कृष्णाली दत्ताराम घरट (एफ.वाय.एल.एल.बी.) कु.स्वरूप गणेश पाटील (एफ.वाय.एल.एल.बी) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अभिमानास्पद कामगिरी करत”Best Counsel for Prosecution Award” या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
विद्यार्थ्यांना सन्माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय श्री. जितेंद्र जैन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेसाठी लॅा कॅालेजमधील अभिरुप न्यायालय समिती प्रमुख प्रा.चिन्मय राणे,प्रा.साकेत जोशी आणि प्रा सुरज पूरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन महत्वाचे योगदान केले.प्रा.कौशिक बोडस यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
विद्यार्थ्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड.गौत्तम पाटील,उपाध्यक्षा डॅा.साक्षी पाटील,सेक्रेटरी श्री.गौरव पाटील तसेच लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य सौ.नीलम हजारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले. महाविद्यालयातील आ.क्यु.ए.सी.समन्वयक प्रा.डॅा.संदीप घाडगे,प्रा.नीलम म्हात्रे,प्रा.पियुषा पाटील,विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



