0
4
8
2
9
4
आंदोलन
पुन्हा पुन्हा तेच मुद्दे
फिरून पटलावर येतात
निवडणूकीत दिलेल्या घोषणा
हवेतल्या हवेत विरतात
आणतात फुसक्या योजना
कायद्यात पळवाटा शोधून
गाफील जनता झोपलेली
पुन्हा यानांच देते निवडून
पाच वर्षासाठी यांना
कुरण मोकळे चरायला
ढेरी फुगून तट्ट तरी
होत नाही आवरायला
जिकडे तिकडे अनाचार
विरोधीही घेतात हात शेकून
इमानदारी फक्त श्वानातच
हे सहज जातात विकून
आता तरी जागे व्हा
करण्या दुरितांचे मर्दन
एकच शस्त्र उरले आहे
उठेल पुन्हा आंदोलन
लढा शांतीचा सांभाळून
कायदापूर्ण असावे वर्तन
शासन टपले गिळण्यासाठी
तुमचे आमचे होईल कर्तन
सविता धमगाये,नागपूर
=================
0
4
8
2
9
4



