0
4
8
2
9
7
प्रेमाने होत आहे रे
प्रेमाने होत आहे रे
नको द्वेषाची आस
द्वेषाच्या या मोहमायेत
भले-भले गेले लयास
द्वेषात विनाश कौरवांचा
नि क्रोधात जळली लंका
तरीही वाजतो जगती या
द्वेष – क्रोधाचाच हा डंका
नागासाकी नि हिरोशिमाचे
अजूनही…..ते घाव ओले!
तरी बांधतो इराण इस्त्राईल
नित नव्याने युद्धाचे झुले!
प्रादुर्भाव हा राग – द्वेषाचा
मनु उत्क्रांतीस नव्हेच बरा
जगा आणि जगू द्या
हाच मानवाचा धर्म खरा
अनुसरा बौद्ध तत्वांना
वाहू द्या शांततेचा वारा
मिटवून सारे वादविवाद
फुलवू या प्रेमाने धरा
वनिता गभणे
आसगाव भंडारा
==========
0
4
8
2
9
7



