माय मराठीचं सांगणं
कामात असता
तू मला जवळ
ओढते अधाशी
रिकाम्या क्षणी
दुसऱ्याच एका
धुंदीत असशी..१
माय माझी मराठी
म्हणतोस हसून
करतेस लाडही
गालगुच्चे धरून
शृंगारलेस मला
काना मात्रा लावून.. २
उकर वेलांटी
कानात शोभती
अक्षरे मोती
लाडात येती
तुझे गुणगुणणे
ऐकून बसती..३
जातो इंग्रजीवर
कधी कधी सूर
सारखी धडधड
परक्यास पाहून
मनस्वी वाढते
दुःखाची फडफड..४
बघते काहींना मी
दूरदूर जातांना
सरणावर ठेवताना
तुझ्या कोपऱ्यात
बीज अंकुरलेला
दिसतो गोजिरवाणा..५
अंकुरलेलं बीज
दिसलं टवटवीत
वाटले तेव्हाच
खरं आहे तुझं
व्यक्त केलेलं
माय मराठीचं..६
जिजाऊच्या त्या
..स्वयंभू भाषेची
आब राखावी
महाराष्ट्राच्या त्या
रंगीन बोलींची
इज्जत करावी..७
बाळा नकोस
होऊ दूर केव्हाच
राहा केशरी सम
निळ्या आकाशी
पूर्व संध्येच्या त्या
उगवणाऱ्या ताऱ्यासम..८
निर्मला जीवने, नागपूर
========



