Breaking
अमरावतीई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

घरकुल

श्रीमती सुलोचना लडवे

0 4 8 2 8 6

घरकुल

जिथे आपुलकीचा वास
असे प्रेमाचा सहवास
चार भिंतीच्या घरात
गुंफण रक्ताची ही खास

एकमेका देती साथ
असो भयाण आव्हान
पाठबळ एकदुजा
निस्तरती घमासान

एक दुजासाठी जगती
गाठ रेशीम नात्याची
नाही सुटणार कधी
आकर्षण नाते बंधाची

किलबिल पाखरांची
नित्य चाले श्रवणीय
सुख,हर्ष,समाधान
सा-या जगाहून प्रिय

येवो भयाण वादळ
करी सामना मिळून
एकोप्याचा आदर्श
राही कुटुंब जुळून

एकमेकांसाठी असे
अनुकुल प्रेमभाव
घरकुल हे सौख्याचे
तारी कुटुंबाची नाव

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे