पुरोहितांना एक कर्तव्य म्हणून दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुरोहितांना एक कर्तव्य म्हणून दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे, (दि २३ नोव्हें.): अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा पुरोहित आघाडीतर्फे नुकतेच एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पौरोहित्य करणाऱ्या 71 पुरोहितांना एक कर्तव्य म्हणून दिवाळीचा फराळ व साखर, तांदूळ हे धान्य वाटप करण्यात आले.
पूर्णान्न फूडच्या संचालिका किरण प्रभुणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवाळीचा फराळ आपल्या पुरोहित बांधवांना दिला तसेच पुणे जिल्ह्याकडून धान्य शिधाचे पॅकेट्स देण्यात आले.
आगामी वर्षात पुरोहितांसाठी वैद्यकीय कार्ड, सरकारी योजना, शैक्षणिक अनुदान योजना राबवण्यात येतील असे प्रतिपादन पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी सांगितले. आगामी वर्षात पुणे जिल्ह्यातील पुरोहितांना संघटित करण्यात येईल असे आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य यांनी सांगितले.
महिला पुरोहितांना संघटनेशी जोडून घ्यावे असे केतकी कुलकर्णी यांनी सांगितले, पुरोहितांना उद्योजक बनवण्यासाठी विविध व्यावसायिक कार्यशाळा घेण्यात येतील असे प्रसाद गिजरे यांनी सांगितले. सिंहगड रोड वरील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात पुरोहितांनी श्री सुक्ताचे आवर्तने म्हणून या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचा आरंभ केला.
या कार्यक्रमाला, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, संतोष वैद्य, केतकी कुलकर्णी, प्रसाद गिजरे, राहुल भाले शास्त्री गुरुजी, किरण प्रभुणे, सुरेश कुलकर्णी, अर्पिता जोशी, गायत्री वैशंपायन, देवेंद्र शूर गुरुजी, मुळे गुरुजी, जयश्री घाटे,सरिता कुलकर्णी, भालचंद्र जोशी दिपा कुलकर्णी,अशोक बिळगी, गीता बिळगी, सरला कुलकर्णी, संगीता कुलकर्णी उपस्थित होते. ब्राह्मण समाजातील महत्वाचा घटक असलेल्या पुरोहितांचा सन्मान हा निश्चितच संघटनवाढीसाठी फायद्याचा ठरणार आहे यात शंका नाही.



