‘पद्माकर वाघरूळकर’ यांची आदर्श शिक्षक, पत्रकार व साहित्यिक पुरस्कारासाठी निवड
पुरस्कार सोहळा २३ जानेवारी रोजी होणार
‘पद्माकर वाघरूळकर’ यांची आदर्श शिक्षक, पत्रकार व साहित्यिक पुरस्कारासाठी निवड
नाशिकच्या तेजस फाऊंडेशन संस्थेचा उपक्रम
पुरस्कार सोहळा २३ जानेवारी रोजी होणार
जिल्हा प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
छ.संभाजीनगर: (दि. ८ जाने.): श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन शाखेवरील भाषाशिक्षक, पत्रकार व प्रथितयश साहित्यिक पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर (श्रीदत्तिंदुसुत) यांची तेजस फाऊंडेशन नाशिकच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार व आदर्श साहित्यिक पुरस्कार २०२५साठी निवड झाली.
त्यांची ही निवड संस्थेच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध अभिनेत्री, साहित्यिक, गायिका मेघा डोळस यांच्या स्वाक्षरीपत्राने झाली. सदरचा पुरस्कार सोहळा हा दि.२३ जानेवारी २०२५ रोजी डॉ. मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान होणार आहे. पद्माकर वाघरूळकर यांच्या निवडीचे श्री स.भु. शिक्षण संस्थेचा सर्व परिवार, आप्तेष्ट, मित्रपरिवार व साहित्यिकांनी भरभरून कौतुक करून अभिनंदन केले व भावी उज्ज्वल साहित्यिक योगदानासाठी शुभेच्छाही दिल्या.