0
4
8
2
9
7
नंदीबैल
ढवळ्या पवळ्या
निघाले ऐटीत
घुंगरू माळा
बांधून गळ्यात
रोजच्या रोज
एकच काम
आज देऊया
फक्त आराम
सर्जा राजाची
जोडी अनोखी
हळद लोणी
खांदा माखी
घालू मायेने
न्हाऊ माखू
दिवस आजचा
तुमच्यासाठी राखू
अंगावर घाली
मखमली झुली
मुंडाशी बाशिंग
हालता डुली
अश्विनी आनंदराव जगदाळे
ता.केज जि.बीड
======
0
4
8
2
9
7



