Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशसाहित्यगंध

व्हॅलेंटाईन

संध्या मनोज पाटील अंकलेश्वर, जि.भरूच (गुजरात)

0 4 8 2 8 2

व्हॅलेंटाईन

प्रिय व्हॅलेंटाईन…
आज मनात आले, तुला पत्र लिहावे..
तुझ्या उपकारांच्या यादीस पहावे…
जन्मजन्मांचे आहेत प्रारब्ध साठले..
तुझे माझ्यावरील प्रेमाला बघून,
कृतज्ञ भावनेत आसवे दाटले…
कितीदा या आयुष्याची दोरी..
तुटता तुटता तू सावरली आहे..
नैराश्याने विस्कळलेली
मनोदशा तू आवरली आहे…
तुझ्यामुळे हे हृदय धडधडतय…
गोठून पडलेल्या वेदना विरघळून,
नवचैतन्याचे रक्त सळसळतंय…
नाशवंत जरी हा देह ..
त्यालाही असते महत्व किती…
तुझ्या असण्यानेच मिळते..
प्रत्येक श्वासास गती…
एक श्वास थांबला,की संपला इथे…
मागे वळूनही तू बघत नाही तिथे…
या सुंदर आयुष्यात तू भरतोस.
तुझ्या आवडीने सुखदुःखाचे रंग…
तुलाही एवढीच इच्छा असते ना,
की मला मिळावा तुझाच संग…
प्रिय व्हॅलेंटाइन….
आज तुझ्या करुणेपुढे,
किती मी नतमस्तक व्हावे…
तू माझ्यातलाच ‘आत्माराम..’
कोणते भावपुष्प मी तुला वहावे…
तुझ्या निस्वार्थ भरभरून देण्याचे,
कोणत्या शब्दात धन्यवाद मानावे…
वाटले माझे तुझ्यावरील प्रेम…
शब्दात उतरवून पहावे…
तूच माझा व्हॅलेंटाईन,
हे तुला कळावे…म्हणून..
आज मनात आले, तुला पत्र लिहावे…!

आज मनात आले,तुला पत्र लिहावे…!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, जि.भरूच (गुजरात)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे