Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशसाहित्यगंध

नऊ रंग, नऊ भाव

दीपाबेन शिंपी (दीपांजली) जिल्हा नवसारी,गुजरात

0 6 3 0 8 8

नऊ रंग, नऊ भाव

लाल रंग देतो शौर्याची हाक,
अन्यायापुढे नको झुकू मान,
संकटांशी लढण्याची देतो शक्ती,
धैर्याने उजळू दे जीवनाची ज्योती!

पांढरा रंग देतो शांतीचा साज,
प्रेमाने जिंकू या माणसांचे मन आज,
राग-द्वेष सारे मनातून मिटवू,
स्नेहाच्या वाटेवर आनंदाने चालू!

पिवळा रंग देतो आनंदाची पहाट,
आशेच्या किरणांनी उजळते वाट,
हास्यफुलांनी सजवू जीवनाचे दार,
सुखाची बरसात होवो अपार!

हिरवा रंग देतो निसर्गाचा साज,
धरतीच्या कुशीत फुलतो जीवनराज,
वृक्ष लावून धरती सजवू,
निसर्गाच्या प्रेमात जीवन फुलवू!

निळा रंग देतो भक्तीचा ध्यास,
आईच्या चरणी श्रद्धेचा सुवास,
मनातील भावांनी आरती सजवू,
नामस्मरणाने जीवन उजळवू!

केशरी रंग देतो त्यागाची शिकवण,
सेवेतच दडले जीवनाचे भूषण,
स्वार्थ विसरून परहित साधू,
त्यागाच्या वाटेवर आनंदाने चालू!

गुलाबी रंग देतो प्रेमाचा गंध,
जिव्हाळ्याने जोडू हृदयांचे बंध,
दुःखी जीवांचे अश्रू पुसू,
प्रेमाच्या फुलांनी जग सजवू!

करडा रंग देतो संघर्षाची जिद्द,
ध्येयाप्रती ठेवू विश्वास दृढ,
वादळ आले तरी न डगमगू,
जिद्दीच्या बळावर यशाला गवसू!

जांभळा रंग देतो स्वाभिमानाचे बळ,
आत्मविश्वासाने गाठू यशाचे शिखर,
स्वतःची ओळख अभिमानाने जपू,
सन्मानाने जगण्याची शपथ घेऊ!

नऊ रंग, नऊ भाव, नऊ शक्तींचा जागर,
आई जगदंबेचा भक्तिमय जयजयकार!
रंगांतून शिकू माणुसकीचा ध्यास,
नवरंगांनी फुलवू आनंदाचा श्वास!

दीपाबेन शिंपी (दीपांजली)
जिल्हा नवसारी,गुजरात

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 0 8 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे