हजारीपहाड येथे वयोवृद्ध नागरिकांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
रजत डेकाटे- प्रतिनिधी
हजारीपहाड येथे वयोवृद्ध नागरिकांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
रजत डेकाटे- प्रतिनिधी
नागपूर येथील हजारीपाड येथे वयोवृद्ध नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच दक्षिण पश्चिम नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणय हाडके यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार यांच्या व दक्षिण पश्चिम नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणय हाडके यांच्या हस्ते वयोवृद्ध नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार यांनी मार्गदर्शन सुद्धा केले.
यावेळी वामनरावजी देठे,सुमित गेडाम, तरुण मेश्राम,छंन्नुलाल मेश्राम, अशोक गेडाम, प्रशांत पाटोळे, सुधाकर मेश्राम, महेंद्र हुमणे, मंगेश गेडाम,सविता मेश्राम,गौतमी हुमणे, केशरबाई मेश्राम, पुष्पा हुमणे,अश्र्वेता बोरकर, रत्नमाला देठे, पंचशिला शेंडे,सिमा वानखेडे, संगिता तायडे, अनिता चंद्रिकापुरे, चंद्रप्रभा मेश्राम,सिलोतमा वानखेडे, सुशिला राऊत, यांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाताई देठे यांनी केले तर आभार शील मगाडे यांनी मानले. सुशिल मंडपे, संघमित्रा पाटोळे, कुसुमताई गेडाम, प्रिया मंडपे,माला मगाडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.