कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
तिरंगा; बी.एस.गायकवाड
0
4
8
2
9
4
तिरंगा
आहे स्वातंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा
आण बाण शान देशाची राखतो तिरंगा
देश रक्षणार्थ सैनिका अभिमान तिरंगा
सीमेवरती डौलाने फडकत राही तिरंगा
प्राणाची आहुती दिदली त्या हुतात्म्यांनी
तयांच्या स्मरणार्थ उभा असतोय तिरंगा
ध्वजारोहण ते शासकीय निमशासकीय
कार्यालयावर फडकवला जातोय तिरंगा
हाती फडकत राहतील शालेय विद्यार्थी
देशप्रेम मनामनात जागृत तेवतो तिरंगा
विदेशात खेळाडू विजयी होतोय जेंव्हा
हाती घेऊन अभिमानानं फडके तिरंगा
लढतांना धारातीर्थी पडलेल्या सैनिका
लपेटून शव आदराने आणतोय तिरंगा
परदेशातही प्रकर्षाने स्वतःची प्रतिमा
वेगळे अस्तित्व दाखवत राहतो तिरंगा
देशाभिमान जागृत सदैव बहरत जातो
होते आकाशही ठेंगणे फडकता तिरंगा
बी एस गायकवाड
पालम,परभणी
============
0
4
8
2
9
4



