Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

दिस जातील…..दिस येतील…!

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

0 3 4 5 8 2

दिस जातील…..दिस येतील…!

दिस जातील..दिस येतील..भोग सरल सुख येईल..” येणाऱ्या प्रत्येक दिवसात आशावाद निर्माण करणाऱ्या या ओळीच नव्हे तर हे संपूर्ण गाणं आपल्या आयुष्याला एक नवे कलाटणी देणारं ठरतं. (अर्थात या गाण्याचा खरा अर्थ जरी वेगळा असला तरी…) आपल्या आयुष्यातून दिवस जरी निघून गेले तरी आपण मागे उरतो. तसेच आपल्याबरोबर आपल्या आठवणी आणि अनुभव ही शिल्लक राहतातच. त्या सगळ्याच मनाला क्लेश देणाऱ्याचं नसतात तर काही सुखद क्षणांचा गारवा देणाऱ्या ही असतात. त्यामुळेच तर दिस जातील…. या ओळी आपण आपल्या जगण्याचं जीवनसार मानल्या तर जगणं म्हणजे अनुभवांची शिदोरी समजून वागलं तर त्या दिवसांनी शिकवलेलं धैर्य, दुःख,सहनशीलता जबाबदारी याच गोष्टी आपल्या येणाऱ्या दिवसात नवे स्वप्न नवी आशा नवी उमेद निर्माण करतील.

जरी, हरवलेले सर्व काही परत येणार नसलं तरी त्याच्यावर उभे राहिलेले धैर्यच आपल्या जीवनात एक नवीन इतिहास घडवेल. कधी हसवतील कधी रडवतील पण त्या प्रत्येक क्षणात दडलेली ओल आपण समजून घेतली तर पुन्हा जगण्याला नवा अर्थ येईल. जीवनाच्या प्रवासात आयुष्याच्या वेगवेगळ्या रंगमंचावर उभे राहून वेगवेगळ्या भूमिका आपल्याला वठवाव्या लागतात.प्रत्येक वेळी वेगळे मुखवटे धारण करून आपण आयुष्य जगत असतो. इतरांनाही जगवत असतो आणि आपली भूमिका पार पडत आपलं कर्तव्य निभावत असतो. तिथे कधी अपयश पचवावे लागते तर कधी *यश आपल्याला खांद्यावर घेऊन नाचवत असतं. आपल्याला ते सांगत असतं की, “बाबा रे प्रत्येक दिवस नवा आहे. काल गेला, उद्या येईल पण आज तुझ्या हातात आहे. त्याला सजव त्याला मिरव आणि मुठीत पकडून ठेव. ते निसटेल ही कदाचित,, पण मनाला त्याने केलेला हळुवार स्पर्श तुला आनंद सुख याची आठवण करून देत राहील.

माझ्याही आयुष्यात असे अनेक क्षण, अनेक प्रसंग आले होते. आणि ते काळजाला जाऊन भिडले. कधी अगदी जवळची व्यक्ती सोडून गेली. कधी जवळच्या व्यक्तींने केसांना गळा कापावा म्हणतात ना, तसे दुःख दिले. कधी पाहिलेल्या स्वप्नांना नुसते तडेच नाही केले तर ते स्वप्न उन्मळून पडले, ते कधीही पूर्ण न होण्यासाठी.. कधी नात्यांचे बंध तुटले…अशा प्रत्येक वेळी मनात एकच विचार येई की हे दुःख दुःख कधी संपेल?याचा शेवट असणारच नाही का…? त्यावेळी या गाण्याच्या ओळी आठवल्या..
मौत आनी हैं आयेगी एक दिन
जान जानी है जायेगी एक दिन
ऐसी बातों से क्या घबराना..
आणि या एकाच सकारात्मक आशावादी विचारांनी मला कुशीत घेतलं आणि जणू जगण्याचा नवा मंत्र दिला.

जुन्यांची होईल गाथा तीही सार्थ
नव्या वाटांना येईल नवा अर्थ
आज त्याच ओळींच्या कुशीत या मंत्राच्या जयघोष करत मी जुन्या स्वप्नांना पुन्हा नव्याने फुलवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच तर, शब्द मनात साठवून ठेवण्यापेक्षा अश्रूंना बरसू दिलं. त्याच्या या वाहत्या प्रवाहात नविन आशा अपेक्षांची बाग फुलवत जीवनाच्या नवीन पर्वा ला सुरुवात करून अपेक्षापूर्तीचा बगीचा फुलवत आहे. तुम्ही पण नक्कीच या ओळींना नेहमीच आठवत रहा…

नवीन दिवस येतील पुन्हा मनात उमटतील नव्या नव्या आशा
संघर्षाच्या सावलीत उगम पावतील नव्या स्वप्नांच्या सुंदर रेषा…”

गेलेले दिवस सोडून द्या असे मी म्हणणार नाही, तर ते दिवसही काळजात जपून ठेवा त्यामुळे कधी त्यातून डोळ्याच्या कडा ओलावतील तर कधी अलगद गालावर स्मित उमटेल आणि जीवनाला सुगंध येईल. पण यासाठी आपला आपल्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असणं गरजेचं असतं. कारण आपलं जीवन म्हणजे एक सतत चालणारी वेळेची वाटचाल असते. जसे की सूर्यास्त झाला की रात्र होतेच पण पुन्हा नव्याने नवा सूर्य उगवणार असतोच. या निसर्गाच्या नियमांना अनुसरून आपण ही येणार दुःख,नैराश्य, अपयश याला सूर्यास्त समजून सुख, यश,आनंद घेऊन येणाऱ्या सूर्योदयाची वाट पाहायला हरकत नाही. अर्थात वेळ हाच आपला खरा जीवनसाथी असतो. तोच तर सुख व दुःख घेऊन बदलत राहतो.
आज रडवतो उद्या हसवतो, तेव्हा मनात हाच विश्वास जागवतो की, उडूनिया जाईल ही आसवांची रात
आपल्यासाठी उद्या फुटलं पहाट.. या ओळीप्रमाणे आलेल्या दिवसाच्या स्वागताला सज्ज होऊन नव्या उमेदीने त्याचे स्वागत करू या. जीवनाला मिठी मारूया हसण्याच्या फुलांनी मांडव सजवू या आणि आयुष्य फुलवू या.. तेव्हा
दिस जरी जातील पण त्याच सौंदर्य, त्याचे धडे आपल्या येणाऱ्या दिवसांना नवा आकार निश्चित देतील..

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 4 5 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
23:49