0
4
8
2
9
0
गळती झोपडी
“लहानपणी बघितली
माझी गळती झोपडी “
“गरीब होतो आम्ही
म्हणून बांधली झोपडी “
“पाऊस आलाय की
मग गळत होती झोपडी “
“पाणी गळत असताना
खाली ठेवायचो भांडी “
“पाणी गळत असताना
मग वाजायची भांडी “
“संगीताच्या ताल कानी
येत रात्र आम्ही काढी “
“गळती झोपडी माझी
तरीही खूप खूप आवडी “
“अजूनही आठवते मला
सुंदर गळती झोपडी “
“आता कुठेही मजला
दिसत नाही ती झोपडी “
“प्रत्येकजण बांधतो आता
घर, महल, बंगला,माडी “
हणमंत गोरे
ता. सांगोला, जि.सोलापूर
0
4
8
2
9
0



