
0
5
1
7
7
1
स्वागत नव वर्षाचे
स्वागत नव वर्षाचे
निर्मळ मनाने करू
चैत्र मास प्रतिपदेला
चला गुढी आभारु
आला मराठी वर्ष
झाला मनाला हर्ष
चला करू संकल्प
बदलवू काया कल्प
नव्या प्रेरणेने भावनेने
लागू कामाला जोमाने
घडून येईल परिवर्तन
तेही मांगल्य मांगल्याने
चला बांधू तोरण पताका
पसरवू सुहासिक गंध
सुगंधित करू वातावरण
वाहिल गंध मंद मंद
गुढीपाढवा हा
आहे मांगल्याचा सण
देऊ शुभेच्छा सर्वांना
ठेवून निर्मल मन
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
5
1
7
7
1



