0
4
8
2
8
6
बाप्पा आला रे
आला रे, आला
बाप्पा आला रे
स्वागत करूया
गुलाल उधळा रे
उंच आसनी ठेवा
मंडप सजवा रे
मखमलीची,छान
आरास करा, रे
ढोलतांशे वाजवा
आता,चला नाचा रे
ठेका धरू, तालावर
आता, गाणं गाऊ रे
गजर मोठयाने करू
गणपती बाप्पा मोरया रे
नारळ फोडू शुभ मुहूर्ती,
मोठ्याने आरती म्हणा रे
प्रसाद काय काय?
साखराचे,मोदक, रे
एकच ठेवू, भक्तीभावे
बाकीचे सारे,खाऊ रे
मायादेवी गायकवाड ठोकळ
ता.मानवत, जि.परभणी
=======
0
4
8
2
8
6



