
0
4
8
2
8
4
लढाई
रस्त्यात आडवा मी
कधी झालो नाही कुणाच्या
न केले कृत्यही कोणते
विरोधी माझे मनाच्या
केला मार्ग मोकळा
पुढे जाऊ देण्या अनेकांना
तरीही हा खटकतो
कळेना मी कित्येकांना
ना फसविले, ना झुलविले
ना केला कधी कोणता बडेजाव
झटलो कल्याणसाठी, परक्यांच्या सोसले
भलेही हृदयावरती घाव
तक्रार माझी नाही कुणाशी
पाषाण केले आता हृदयाशी
संघर्ष माझा सदा नियतीशीही
लढतो आताही स्वतः,स्वता:शी
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, नागपूर
0
4
8
2
8
4



