डॉ. सौ.नीलम किशोर हजारे यांना ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’सन्मान
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
डॉ. सौ.नीलम किशोर हजारे यांना ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’सन्मान
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अलिबाग, (दि. ४ ऑक्टोबर): लोकमत समूह, JSW, GAIL आणि RCF यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ सन्मान प्रदान सोहळ्यात अलिबाग येथील ॲड.दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सौ. नीलम किशोर हजारे यांना प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अलिबाग येथील पी. एन. पी. नाट्यगृहात, रायगड जिल्ह्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास लोकमत समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजय शुक्ला, लोकमतचे सहयोगी संपादक श्री. संदीप प्रधान, तसेच JSW चे मानव संसाधन उपाध्यक्ष श्री. बळवंत जोग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महिलांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने लोकमत समूह दरवर्षी हा पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करीत असतो.डॉ. सौ.नीलम हजारे यांना शिक्षण, सामाजिक कार्य, महिला सबलीकरण आणि समाजजागृती या क्षेत्रातील प्रभावी योगदानासाठी “आम्ही सावित्रीच्या लेकी” या सन्मानाने गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारताना त्यांनी लोकमत समूहाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, “हा सन्मान माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला अधिक गती आणि प्रेरणा देणारा आहे,” असे मत व्यक्त केले.
या सन्मानाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, कार्यवाह श्री. गौरव पाटील यांनी डाॅ. सौ निलम हजारे यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी प्रा. निलम म्हात्रे, प्रा. डॉ. संदीप घाडगे, प्रा. चिन्मय राणे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. कौशिक बोडस, प्रा. सुरज पुरी, प्रा. साकेत जोशी, श्री. प्रपेश पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी डॉ. सौ. नीलम किशोर हजारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.





