0
4
8
2
9
0
सनई चौघडा
उषा आली क्षितीजा वरती
पल्ला निशेचा पार करूनी
प्रभाकराची पसरली लाली
अंतरपाट धुक्याचा सारूनी
शिवनापाणी खेळत पक्षी
सनई चौघडा वाजू लागली
ललनाही मग जात्यावरती
सुरात ओव्या गाऊ लागली
घंटानाद होऊनी राऊळी
भजनाचे सूर निनादू लागले
साथ देऊनी वासुदेवही मग
भूपाळीचे स्वर आळवू लागले
सडा रांगोळीच्या नक्षीने
पहा कसे अंगण सजले
शीत वारा वाजे पावरी
मनी मोरपीसे उडू लागले
सोनकोवळ्या उन्हामधी
तरूवेलींवर दवबिंदू हसले
नजारा सृष्टीचा हा पाहूनी
देहभान मज हरपून गेले
सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
0
4
8
2
9
0



