आरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला ड्रमस्टीक पुरी
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
4
माझी पाककला
ड्रमस्टीक पुरी
साहित्य : २वाट्या कणिक,१वाटी ज्वारीचे पीठ ,१वाटी चनाडाळीचे पीठ,२टोमॕटो,२कांदे,हिरवी मिरची व लसुणपेस्ट दोन चमचे,धनेजि-याची पूड एक चमचा,हळद,मीठ,एक वाटी चिरलेली कोथिंबीर ,शेवग्याची पाने दोन वाटी ,तळण्यासाठी तेल इत्यादी
कृती: सर्व पीठ परातीत घ्या.टोमॅटो व कांदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.वरील सर्व जिन्नस घालून घट्ट गोळा भिजवा.छोट्या पु-या लाटून तळा व चिंचेच्या गोड चटणीसोबत खायला द्या गरमागरम ड्रमस्टीक पु-या.
टीप- याची सुकी भाजी करून खाऊ शकतो.बाजारात विकायलाही येते.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
4



