ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेरायगडसाहित्यगंध
उरलो उपकारापुरता
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0
5
9
4
1
4
उरलो उपकारापुरता
चाळली मी वेळीच जेव्हा,
माझ्या आयुष्याची गाथा
भाव मनात माझ्या एकच,
आता उरलो उपकारापुरता
सांगू कसा कुणा मी,
या आयुष्याची चित्तरकथा
कोण घेणार जाणून,
या माझ्या मौनाच्या व्यथा
जीवनगाणे हे माझेच,
मीच आळवितो सूर आता
सांगतो जगास सार्या,
आता उरलो उपकारापुरता
सारे माझेच असती,
वाहतो दुनियेची चिंता
उगाच थबकती पाऊले,
का टेकतो माथा
केले उपकार किती,
त्याची रचिली न कथा
भान होते वास्तवाचे,
आता उरलो उपकारापुरता
माझा श्वास फुलतो कधी,
कुणा कळणार व्याकुळता
गजबजलेल्या मार्गावरही,
दिसे भयाण शांतता
उरले ना माझे मीपण
कशास वृथा हिणवता
भल्यासाठीच इतरांच्या आता,
आता उरलो उपकारापुरता
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
=======
0
5
9
4
1
4



