0
4
8
2
9
3
शिवशाही
आल्या गेल्या, कित्येक शाह्या
तरली,महाराष्ट्रात शिवशाही,
सुराज्य स्वराज्य आणि न्यायाने
रुजविली,शिवबाने शिवशाही.
न्याय आणि सत्याने वागून
पुत्रवत प्रेम केले जनतेवर,
स्वतः दोन हात करून शत्रूशी
पहिला वार घेतला स्वतःवर.
माँ जिजाऊ आणि शहाजीराजे
यांचे पुत्र शोभते जगी,
भवानी देवीच्या आशीर्वादे
न्यायाचे राज्य, आणले जगी.
ऐकेक मावळा होता त्यांचा
शंभर,सैन्याहून बलशाली,
मित्र आणि सखे सोबती
यांनी जपली शिवशाही.
वाघासारखे कर्तृत्व ज्यांचे
शिंहासारखी कार्याची गती,
भेदक ज्यांची नजर होती
क्षणात,शत्रूची गाळण करती.
गड आणि किल्ले घेऊन
राज्य केले शर्थिने,
शौर्य पराक्रमाचे गोडवे गाऊन
इतिहास सांगू अभिमानाने.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
=============
0
4
8
2
9
3



