0
4
8
2
9
7
योगदान
स्वार्थी ही दुनिया स्वार्थी असे भाव,
सहाय्या धावाया……नसे अवसान…
वायफळ कृत्य ……मांडतात डाव,
सांगा येथे कुणी..दिले *योगदान*…१
दाविले आमिषे , दिले स्वप्न फार,
मोहमाया पाश,दाविला अपार…
नाही झाली पूर्ती, डोईवर भार,
स्वप्नांचा चुराडा,झाला बंटाधार…२
वचने भाषणे,ठरलीत फोल,
जागोजागी यांचा,दिसतोय झोल…
रडकुंडी आली,जनता अबोल,
तरी वाजविते,विकासाचा ढोल…३
जगायचे कसे,मृल्यवृद्धी जोर,
मरण्यापेक्षा हो,जगणे कठोर…
‘सुधाकरा’ सांगे,घ्यावी शिकवण,
कोण योगदानी, आणि कोण चोर…४
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========
0
4
8
2
9
7



