Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

महाराष्ट्र माझा

सविता धमगाये ता कामठी, नागपूर

0 5 5 6 4 4

महाराष्ट्र माझा

थोडा उनाड थोडा रांगडा
राकट थोडा शेतकरी राजा
दऱ्याखोऱ्यातून घुमती वारे
माय मराठीचा गाजावाजा

खडकाळ तुंबळ रान कुठे
कुठे हिरवेगार मळे
मयूरपंखी आमराईतून
सुवासिक आम्रमोहर दरवळे

मैलावर बारा बदले बोली
पिके वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड
कुठे पुणेरी शुद्ध मराठी
कुठे बहीणाईची अहिराणी भराड

आपले तुपले मपले सारे
महाराष्ट्रात माझ्या खपले सारे
परप्रांतीय ही गुण्यागोविंदाने
मजेत नांदती सुखाने सारे

गर्जू चला गीत महाराष्ट्राचे
चला लावू या एकच नारा
रंग असूद्या वेगवेगळे
महाराष्ट्र मरहट्टा प्यारा
महाराष्ट्र मरहट्टा प्यारा

सविता धमगाये
ता कामठी, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 6 4 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे