वल्लभ विद्यामंदिर पाडळदा शाळेत शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा शाळेत शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
नंदूरबार: शहादा तालुक्यातील नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत ‘अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त विविध शैक्षणिक साधन साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. सदर शैक्षणिक प्रदर्शन ‘चला शिकु या खेळणीद्वारे’ , आणि ‘चला शिकू या भित्तिपत्रकातून’ या संकल्पनेवर आधारित होते.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन वल्लभ विद्यामंदिर पाडळदा शाळेचे मुख्याध्यापक अंबालाल चौधरी पर्यवेक्षक गणेश पाटील आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक योगेश सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन पहाणीने संपन्न झाले. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात शैक्षणिक साहित्याची पहाणी प्रत्यक्ष खेळणी व भित्तिपत्रकांद्वारे अध्ययनाचा आनंद घेतला.सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या विषयी माहिती सांगितली.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शन उपक्रमाचे नियोजन अरविंद पटेल,तुषार पाटील,आमृत चौधरी,मल्हारराव ठाकरे यांनी केले. महेंद्र पटेल,भूपेंद्र पाकळे,धर्मेंद्र कुवर,चतुर पाटील,दिव्या पाटील,दामिणी शिंदे,अश्विनी पाटील ,मनिषा दाभाडे ,राजुू वसावे आदी शिक्षकवृंद तसेच विनोद गोसावी,योगेश पाडवी,पुष्कर पाटील शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. मुख्याध्यापक अंबालाल चौधरी आणि पर्यवेक्षक गणेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.