Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था, नागपूरतर्फे मुंबई मंत्रालयात निवेदन.

विविध मागण्या मान्य करण्यासाठी 'रमाई' संस्थेकडून पुढाकार

0 4 8 2 9 7

स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था, नागपूरतर्फे मुंबई मंत्रालयात निवेदन.

विविध मागण्या मान्य करण्यासाठी ‘रमाई’ संस्थेकडून पुढाकार

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

मुंबई :स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था कडून मुंबई मंत्रालयात विविध मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. मुंबई येथे इंदु‌मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य स्मारकांत त्यांच्या पत्नी रमाई यांचा पुतळा बसविण्यात यावा व त्यांच्या जिवनावरील कायमस्वरुपी चित्र प्रदर्शनी लावण्यात यावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्यावर 27 मे 1935 रोजी मुंबईच्या वरळी स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या स्थळावर रमाईचे स्मारक उभारण्याची घोषणा काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने केली. परंतु अजूनही हे काम सुरु झालेले नाही या कामाची सुरुवात तातडीने करून सरकारने वचनपूती करावी.
मुंबईतील परड बी.आय.टी. चाळ क्र.१ खोली क्र.५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचे 1912 ते 1934.असे प्रदीर्घ वास्तव्य होते. या ठिकाणी सरकारने घोषित केल्याप्रमाणे स्मारकाची निर्मिती तातडीने सुरू करावी.

दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल असे नामकरण करण्यात यावे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण गेले. तेथील त्यांच्या घराची वास्तु आता दुर्लक्षित आहे. या वास्तूचे जतन करण्यासाठी स्मारक घोषित करून तातडीने काम सुरू करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुटुंबियांचे मुळ गाव आंबडवे व रमाई आंबेडकर यांचे जन्मगाव वणंद (जिल्हा रत्नागिरी) येथे विकासकार्य करावे व पर्यटन क्षेत्र घोषीत करावे.
सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव राहिलेल्या ठिकाणी स्मारकाचे कार्य तातडीने सुरु करावे.

डॉ. बाबासाहेच आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई यांची जन्मभूमी आंबेटेंबे, ता. मुरबाड जि. ठाणे येथे त्यांचे निवास असलेल्या ठिकाणी भिमाई स्मारक उभारण्यात यावे.पुणे जिल्हयातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास स्थानाजवळील प्लॉट क्र. 29 ते 34 चो मोकळी जागा अधिग्रहीत करून स्मारक निर्मिती करावी. भीमा-कोरेगाव स्मारकाचे सौंदर्याकरण सरकारच्या घोषणेनुसार करण्यात यावे. रमाई आंबेडकर यांचे जीवनचरित्र इयत्ता ९वी ते १२ च्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे. नागपूर येथील दीक्षाभूमीला लागुन असलेली कृषि विद्यापीठाची जागा दीक्षाभूमिच्या उपयोगासाठी देण्यात यावी.
नागपूर येथील अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्याच जागेवर पुर्नबांधणी सुरु करावी.

नागपूर शहरात महानगर पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त घोषित स्मारकाचे काम यशवंत स्टेडियम येथे तातडीने सुरू करण्यात यावे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे जयभीम चे जनक बाबु हरदास एल. एन. यांचे स्मारक उभारण्यात यावे. महाराष्ट्रातील बुद्ध लेण्या हा राष्ट्राच्या समृद इतिहासाचा पुरावा आहे परंतु, या लेण्यांचे विद्वपीकरण होतांना दिसत आहे. या बाबीची गंभीर दखल घेऊन सर्व लेण्यांचे सरंक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी, रमाई आंबेडकर यांची भाची शुभांगी धोत्रे/वाघचौरे, बहुजन धम्ममिशनचे अध्यक्ष गौतम मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजेंद्र वाघचौरे, मयुर शिर्के आदींनी निवेदन दिले आहे

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे