
0
6
6
7
2
0
एक होती परी
छोटीशी गोंडस
एक होती परी
पंख तिचे चमचम
हसू तिचे गोड गोड
चांदण्यात फिरायची
ताऱ्यांची गप्पा करायची
तऱ्हेतऱ्हेच्या रंगीबेरंगी
फुले तिला आवडायची
ती आकाशात उडायची
पक्ष्यांची मैत्री करायची
पांढऱ्या झग्यात खूप
छान देखणी दिसायची
रात झाली की यायची
खाली उशाशी बसायची
गोड बाळा झोप आता
हळूवार ती म्हणायची
सकाळ झाली की जायची
पुन्हा यायचं वचन द्यायची
अशी आमची छोटी परी
लाडकी होती सगळ्यांची
प्रतिमा नंदेश्वर
मूल जि.चंद्रपूर
0
6
6
7
2
0



