ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
हा रुसवा सोड ना..
कुसुम पाटील कसबा बावडा,कोल्हापूर
0
4
8
2
9
3
हा रुसवा सोड ना..
दोन घडीचा खेळ नव्हे
हा जन्माचा मेळ असे
डाव मांडून का मोडावा
आता अशी ती वेळ नसे
हा रुसवा सोड ना…
तू बंदने सारी तोडना
तुझ्या प्रीतीने बेधुंद झाले
असे काय घडले सांगना
तुझं मखमली तारुण्य मज
भुरळ घालती क्षणोक्षणी
सोड हा अबोला रुसवा
नको ठेवू अविश्वास मनी
काटा लागला पायी तुझ्या
माझ्या हृदयी यावी कळ
हसत मुखानेच झेलावी
परस्परांनी थोडीशी झळ
भांडावे तू राग भरल्या मनाने
या मनामनात भेद पडू नये
जपू भावनांना हृदयात साठवून
रोज रोज खटके झडू नये
कुसुम पाटील
कसबा बावडा,कोल्हापूर
=======
0
4
8
2
9
3



