Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘अभिजात मराठी बहिणीची’ अशीही अविस्मरणीय भेट

वसुधा नाईक पुणे

0 4 8 2 9 0

‘अभिजात मराठी बहिणीची’ अशीही अविस्मरणीय भेट

दि. 13/05/2025 रोजी स्वाती ताईकडे जाण्याचा योग आला. माझे पुरस्कार साहित्य मा. राहुल सर आणि तारका राणी यांनी स्वाती ताईकडे दिले होते. ते घेण्यासाठी मी गेले होते. ताईंना बरे नव्हते, तरी पण गेले होते. प्रत्यक्ष भेट मला घ्यायची होती. आजची भेट अविस्मरणीय. ताईंनी त्यांचे “मंगलता” पुस्तक दिले. मी माझे ” आईचे हळवे मन ” दिले. पुरस्कार घेतला. साहित्यगंध ताईंनी छान साडी गिफ्ट दिली.”अभिजात गौरव मराठी 2025 ” मिळाले. बहिणीचे माहेरपणच जणू असे वाटले.

चहा, बिस्कीट, सफरचंद यांचा आस्वाद घेतला. जाताना शेतातील वानवळा त्यांनी दिला.जीजू देखील भेटले. खूप छान जोडी, घर मस्त, खेडेगावाचे वातावरण खूप वर्षाने पाहिले. माझी चार नातवंडे कोंबड्या, शेळी, गाई प्रत्यक्ष पाहत होती. कोंबड्यांशी खेळत होती. मजा घेत होती. आणि आम्ही त्यांची मजा पाहत होतो.

ताईंच्या शेजारचे एक वयस्कर गृहस्थ यांनी आमची चौकशी केली. त्यांना खूप आनंद झाला. मी पण एक शिक्षक होते ऐकून. ते बोलले ” खूप हुशार आमच्या बाई ( स्वाती ताई ) आणि तुम्ही पण तशाच खूप मोठी लेखक माणसं तुम्ही… मला खूप अभिमान वाटला आज. ताईंचा बंगला मस्त आहे. भोवती पेरू, मोगरा, अबोली, चिकू अशी झाडे आहेत. शेजारीच शेती आहे… ऐकून खूप मस्त वाटले. माझा चार वर्षाचा नातू मस्त रमला होता. आम्ही दोघी तर खूप खुश होतो.

मा. राहुल सरांमुळे आज एक जुनीच ओळख नव्याने झाली. धाकटे पंढरपूर हे मंदीर पाहिले. मनाला खूप शांतता मिळाली. शिलेदार परिवाराला भेटायचे होते पण घरगुती अडचणीत सापडल्यामुळे नाही येऊ शकले. पहाटे दारात आलेली गाडी त्या दिवशी मला परत पाठवावी लागली.अशी भेट होणार होती. यासाठी कदाचित असेल असे.

वसुधा वैभव नाईक. पुणे.
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे