Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

काळीमा माणूसकीला; सरला टाले

0 4 8 2 9 0

काळीमा माणुसकीला

स्वैराचार माजलाय सुसाट
माणुसकी झालीय पिसाट
वासनांधतेने वखवखलेले
लांडगे सुटतात मोकाट ॥

भयभीत झालेय मातृत्व
असुरक्षित झालेय स्त्रीत्व
रक्षाबंधनाच्या धाग्याचेही
धोक्यात आलेय अस्तित्व ॥

काय गुन्हा केला
कूस तिची उजवली
राक्षसी प्रवृत्तीला प्रसवून
वांझोटीच ती राहिली ॥

क्षणभंगूर भूक भागवण्या
देह तिचा ओरबाडला
निष्ठूरतेचा कळस गाठून
फासला काळीमा माणुसकीला ॥

जगत्‌जननी- जगन्माता
पूजता तिला येता जाता
दांभिकतेचा आव आणून
का रे तिचे लचके तोडता ॥

नको योजना नको धन
अभय हवे जगण्यासाठी
स्वच्छंदपणे मोकळा श्वास
उंच भरारी घेण्यासाठी ॥

सरला टाले राळेगाव यवतमाळ
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे