
0
4
8
2
8
4
प्रेमामृत
गुलाबी त्या ओठांतून
पाझरतो मधुगंध
निरंतर चुंबनातून
वाहतो गं स्नेहगंध
स्नेहगंध अंतरीचा
विश्वासाचं गं नातं
प्रेमस्पर्श गं रातीचा
सुखावेल हृदयपातं
प्रेमिकांच्या या दिनाला
प्रेमामृत देऊ घेऊ
तृप्ती मिळेल मनाला
प्रेमांगणी एक होऊ
प्रेमामृत दोघं चाखू
विसरून देहभान
लक्ष्मणरेखा गं आखू
वाढविण्या अभिमान
प्रेमामृताचा गोडवा
पारवा का घुमतोय ?
शोभा आलीय मांडवा
चौघडा गं वाजतोय
संग्राम कुमठेकर
ता. जिल्हा लातूर
0
4
8
2
8
4



