
0
5
1
7
8
7
पाईक संविधानाचे
विषमतेला तिलांजली देण्या
अथक परिश्रमाने लिहिलंय
लोकशाही प्रस्थापित होण्या
भारताला संविधान अर्पिलंय
जगात भारतीय लोकशाही
ठरली आहे सर्वोत्कृष्ट महान
लिहून भारताची राज्यघटना
बाबा तुम्ही दिलं देशाला दान
आम्ही भारताचे लोक म्हणून
व्यापक दृष्टिकोन दाखविला
देशाला प्रथम स्थान देताना
मनात राष्ट्राभिमान जगविला
पाईक संविधानाचे बनलोत
करून संविधानाचा स्वीकार
देशहिताचे निर्णय घेण्यास्तव
जागवू मनी हक्क अधिकार
घराघरात पोहोचेल संविधान
तसे राबवूत विशेष अभियान
पाईक संविधानाचे बनलोत
जीव की प्राण आहे संविधान
बी एस गायकवाड
ता.पालम, जि.परभणी
=========
0
5
1
7
8
7



