आगरी समाज संस्था, अलिबागच्या संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन; समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आगरी समाज संस्था, अलिबागच्या संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन; समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि ०९) : आगरी समाज संस्था अलिबागच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याला नवी दिशा देणाऱ्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा. आमदार श्री महेंद्र दळवी साहेब यांच्या हस्ते नारळ वाढवून तसेच श्री गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत राबविण्यात येत असलेल्या करिअर आणि शैक्षणिक मार्गदर्शन, विवाहमिलन वधूवर परिचय केंद्र, बाल संस्कार वर्ग, रोजगार संधी नोंदणी, आगरी व्यवसाय मार्गदर्शिका, पुस्तक पेढी, समुपदेशन, नोकरी व्यवसाय विषयक मार्गदर्शन यांसारख्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संस्थेचे कार्य पोहोचावे, समाजबांधवांना संस्थेशी सहज संपर्क साधता यावा आणि समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता यावेत, या उद्देशाने संपर्क कार्यालय सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मा. आमदार श्री महेंद्र दळवी साहेब यांनी संस्थेने अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याचे मनापासून कौतुक केले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद निःस्वार्थ भावनेने समाजासाठी करत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. भविष्यातही शिक्षण, संस्कार, समाजसंघटन आणि युवा विकासासाठी असेच नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवावेत अशी सूचना केली. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांना नवचैतन्य आणि पुढील वाटचालीची नवी ऊर्जा मिळाली.
समाजातील अधिकाधिक कुटुंबे संस्थेशी जोडली जावीत आणि संस्थेचे उपक्रम प्रत्येक घरापर्यंत पोहोचावेत, हीच या कार्यालयामागील मुख्य संकल्पना असल्याचे उपाध्यक्ष श्री सुनिल तांबडकर यांनी यावेळी नमूद केले. अलिबागच्या उपनगराध्यक्षा सौ. मानसीताई म्हात्रे यांनी संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री प्रवीण ठाकूर साहेब यांनीही कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना पाठबळ म्हणून ₹२५,०००/- ची देणगी जाहीर करून सुपूर्द केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव श्री प्रभाकर ठाकूर, खजिनदार ॲड. सचिन पाटील, मार्गदर्शक श्री अनंत म्हात्रे, श्री दत्तात्रेय भोपी, श्री नंदकुमार पाटील, श्री शशिकांत मिठागरी, शैक्षणिक उपक्रम प्रमुख श्री मिलिंद धोदरे, श्री मनोहर पाटील, श्री बिपीन टेमकर, श्री वैभव पाटील, श्री संदेश म्हात्रे, श्री इंद्रजीत पाटील, श्री मिलिंद पाटील, श्री प्रकाश मिठागरी, सौ. दिपश्री पाटील, सौ. शुभांगी म्हात्रे, सौ. दर्शना पाटील, सौ. सुप्रिया ठाकूर आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
संस्थेचे सन्माननीय सभासद श्री जयेंद्र मिठागरी यांनी उपस्थितांसाठी त्यांच्या सुप्रसिद्ध पट्टी समोसाची स्वादिष्ट मेजवानी उपलब्ध करून दिली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालय हे केवळ कार्यालय नसून समाजाच्या एकतेचे, विश्वासाचे, सेवाभावाचे आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त केली. प्रत्येक सभासदाने आपल्या वेळेतील थोडासा वेळ समाजकार्यासाठी द्यावा, नवीन कुटुंबांना संस्थेशी जोडावे आणि समाजोपयोगी उपक्रम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही करण्यात आले.
संस्थेच्या ‘एकी • सेवा • प्रगती’ या ब्रीदवाक्याला कृतीत उतरवत भविष्यात भव्य आगरी समाज भवन उभारण्याचे सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



