Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर आरोग्य सुविधेसाठी युवा क्रांती संघटनेचा पुढाकार

वसुधा नाईक, प्रतिनिधी

0 5 8 3 8 4

अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर आरोग्य सुविधेसाठी युवा क्रांती संघटनेचा पुढाकार

निवेदनाची तातडीने दखल; प्रशासनाकडून कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध

वसुधा नाईक, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पारनेर, (दि ७) : ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या परिसरातील आरोग्य सुविधांची वस्तुस्थिती लक्षात येताच युवा क्रांती संघटनेने तातडीने पुढाकार घेतला. संस्थापक अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान परिसरात उपचारासाठी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली. उपचाराची आवश्यकता भासल्यास नागरिकांना शिरूर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये जावे लागत असल्याचेही समोर आले.
ही बाब युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारनेरचे आमदार मा काशिनाथ दाते आणी अहिल्यानगरचे खासदार मा. निलेश लंके यांच्या निदर्शनास आणून दिली. या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

संघटनेच्या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेत अल्पावधीतच डॉक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल युवा क्रांती संघटनेच्या वतीने प्रशासनाचे तसेच मा. निलेश लंके यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी युवा क्रांती संघटना यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या उपक्रमात सहभागी पदाधिकारी :
🌷 मा. राजेश्वर हेंद्रे सर – राष्ट्रीय उपाध्यक्ष
🌷 मा. शिवाजी शेलार – राष्ट्रीय युवा अध्यक्ष
🌷 मा. अमृताताई पठारे – राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष
🌷 मा. संगीताताई रोकडे – राष्ट्रीय महिला सल्लागार
🌷 मा. वैशालीताई बांगर – राष्ट्रीय महिला मार्गदर्शिका
🌷 मा. वसुधाताई नाईक – राष्ट्रीय ज्येष्ठ महिला सल्लागार
🌷 मा. सुरेश आप्पा गायकवाड – राष्ट्रीय सहसंघटक
🌷 मा. अंकुशराव आगरकर – पश्चिम महाराष्ट्र मार्गदर्शक
🌷 मा. सतीश वाखारे – शिरूर तालुका अध्यक्ष
🌷 मा. कल्पना पुंडे – शिरूर तालुका उपाध्यक्ष
🌷 मा. विलास रोहिले – शिरूर तालुका कार्याध्यक्ष
🌷 मा. छायाताई नवले – पुणे जिल्हा कार्याध्यक्ष
🌷 मा. सुदाम रणदिवे, मा. जयश्री रणदिवे – पश्चिम महाराष्ट्र मार्गदर्शक
🌷 मा. संदीप भाकरे – पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष
🌷 मा. लहू सेठ भाकरे – शिरूर तालुका उपाध्यक्ष
🌷 मा. मयूर शिवरकर – पुणे जिल्हा मार्गदर्शक
🌷 मा. अशोक पाचुंदकर – ग्रामीण पुणे जिल्हा मार्गदर्शक

“जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे आणि त्याची तातडीने दखल घेण्यासाठी पाठपुरावा करणे, हेच युवा क्रांती संघटनेचे ध्येय आहे”.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 3 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे