Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

आता कसं होईल?

डॉ.श्री. बालाजी राजुरकर

0 4 8 2 9 4

आता कसं होईल?

आयुष्याच्या वाटेवर प्रश्नाची उत्तर देइल
प्रश्न मात्र कायम होता आता कसं होईल?

बालपणातील दिवसात नेहमी वाटत असावं
मर्जीत राहण्यापेक्षा लवकर मोठ व्हावं
अवलंबून न राहता स्वावलंबनाचे धडे घेईल
प्रश्न मात्र कायम होता आता कस होईल?

युवा झालो शिक्षण घेऊन पदवी मिळत होती
कशी मिळवावी नोकरी प्रश्न सदा पडले होती
तारेवरची कसरत करत जुळवून घेइल
प्रश्न मात्र कायम होता आता कस होईल?

नोकरी करत संसारात रमलो होतो कधी
दुखाचे धक्के बसतच असे डगमगायच कधी
नोकरी संसार करताना हारन नाही येईल
प्रश्न मात्र कायम होता आता कस होईल?

प्रौढं होताच वाटे जिम्मेदाऱ्याच काय होइल
चिंता सतावत मुलाबाळांची त्यांचे कसे होइल
खुश ठेवता सर्वाना लक्ष स्वतःवर न देता येईल
प्रश्न मात्र कायम होता आता कस होईल?

थकलो साथ सोडे शरीर आता वाटाया लागले
केले ज्यांच्यासाठी वाटे कर्तव्य त्यांनी केले
काय होईल जेव्हा मी जग सोडून जाईल
प्रश्न मात्र कायम होता आता कस होईल?

डॉ.श्री. बालाजी राजुरकर
ता.हिंगणघाट, जि. वर्धा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे