‘मन अधू होऊ न दिल्यास यश निश्चितच’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
समर्पण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
‘मन अधू होऊ न दिल्यास यश निश्चितच’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा वैभव नाईक,पुणे प्रतिनिधी
पुणे : “शरीर अधू असताना मन अधू न होऊ दिल्यास प्रबळ इच्छाशक्तीची आणि प्रयत्नातील सातत्याने यश निश्चित मिळू शकते.” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे विचारवंत-साहित्यिक आणि समर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. ते दिव्यांग आघाडीचा ,तरुण कथाकथनकार अजित मोरेश्वर कुंटे यास डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते 2024 चा ‘समर्पण पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला, याप्रसंगी डाॅ.घाणेकर आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या समारोपात बोलत होते.
याप्रसंगी अजितच्या मातोश्री माधवी कुंटे आणि पिताश्री मोरेश्वर कुंटे यांचाही समर्पण संस्थेतर्फे जाहिर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक.अध्यक्ष प्रिया दामले, वर्ल्ड क्विन बीजच्या अध्यक्ष सारिका सासवडे, वसुधा इंटरनॅशनल च्या अध्यक्ष वसुधा नाईक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद कुंटे, भाजपचे कार्यकर्ते डाॅ.विठ्ठल मुरकेवार आदि मान्यवर उपस्थित होते.
ज्योती प्रभुणे यांनी स्वागतगीत सादर केले. वंदना मकरंद घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. संजय कुंटे यांनी आभार मानले मोरेश्वर कुंटे,माधवीकुंटे, प्रिया दामले, सारिका सासवडे आदिंची अजित कुंटेच्या गौरवपर मनोगतं व्यक्त केली. प्रिया दामले यांनी अजित कुंटे यास 2025 चा साहित्य दर्पण पुरस्कार जाहिर केला.
याच सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘डहाळी’ अनियतकालिकाच्या ५२९ व्या अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. अजित हा दिव्यांग असून अनेक शारीरिक व्याधींशी टक्कर देत, अनेक ज्येष्ठ साहित्यिकांच्या पुस्तकातील वाचन,अनेक कथाकथन कार्यक्रम ,त्याचबरोबरच पौरोहित्य ही करत आहे… त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल बोलताना तो म्हणतो , माझ्या आई-वडिलांनी यासाठी अविरत कष्ट केलेले आहेत. मला पुनर्जन्म मिळाला, तर मला हेच आई-वडील हवेत. ही भावना व्यक्त करून त्याने सगळ्यांची मने जिंकली.
अजित उर्फ नंदन याच्या जन्मापासूनच त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून पालकत्व निभावणे त्याच्या आजच्या यशापर्यंत त्याला शक्यतोवर सगळी मदत करणं हे खूप धीराचे व संयमाचे काम कुंटे दांपत्याने केले. माधवी कुंटे यांनी सुपुत्र अजितच्या प्रतिकुलतेवर मात करुन चालू , असलेल्या यशस्वी वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.





