Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताधाराशिवसाहित्यगंध

मी गणिताचा शिक्षक

डॉ.ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 5 1 6 5 1

मी गणिताचा शिक्षक

मी गणिताचा शिक्षक आहे,
संख्यांच्या दुनियेत रमणारा;
बेरीज-वजाबाकीतून जीवनाचा
हिशोब विद्यार्थ्यांना समजावणारा.
सूत्रे, प्रमेये, आकृत्यांमध्ये
तर्काचा दीप पेटवितो;
परंतु मराठीच्या गोड शब्दांनी
मनातला भावही जपतो.
फळ्यावर खडूने काढताना वर्तुळ,
मनात उमटते कवितेची ओळ;
गणित शिकविताना शिस्त देतो,
मराठी देत राहते भावनांची फुलझड.
संख्यांना जसा अर्थ असतो,
तसाच शब्दांनाही मान;
मी गणिताचा गुरु असलो,
तरी मराठी माझा अभिमान!
ज्ञान-विज्ञान शिकविताना
भाषेचा दीप विझू देणार नाही;
गणिताच्या प्रत्येक उदाहरणात
मराठीची गोडी कमी होऊ देणार नाही.

डॉ.ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे