बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: शनिवार दि. १५ नोव्हेंबर व रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय दत्ताराम शंकर रोटकर यांच्या स्मरणार्थ कनक प्रतिष्ठान, मुंबई यांच्या मार्फत इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व प्रथम दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी सर्व व्याख्यात्यांचे संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर कुंडलिक चौगुले सर यांनी विद्यार्थ्यांना गणित – १ व गणित – २ विषयाचे तर सुभाष जगताप सर यांनी इंग्रजी विषयाचे बहुमोल मार्गदर्शन केले.
रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी मा. दिग्विजय पाटील सर यांनी विज्ञान – १ व विज्ञान – २ विषयाचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर, दत्तात्रय अहिरे सर, धनराज फड सर, नितिन शिंदे सर, सुनिल मोरे सर, सचिन भंडारे सर, पल्लवी पाटील मॕडम यांनी उपस्थित राहून बहुमोल सहकार्य केले. मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने रोटकर कुटुंबियांचे, कनक प्रतिष्ठान व सर्व व्याख्यात्यांचे आभार मानले.





